शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

दमदाटी, मारहाण होत असल्यास थेट लोकसभा निवडणूक यंत्रणेकडे तक्रार करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:18 PM

सोलापूर : लोकसभा निवडणूक निर्भयपणे, पारदर्शीपणे पार पडावी म्हणून  निवडणूक आयोगाने या वेळेस डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला आहे. ...

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत सी व्हिजिल अ‍ॅपची सुविधा अपंग मतदारांच्या मदतीसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप मतदान केंद्रात आवश्यक असणाºया सुविधा देण्यासाठी त्यांच्या मदतीला पीडब्ल्यूडी अ‍ॅपही निर्माण

सोलापूर : लोकसभा निवडणूक निर्भयपणे, पारदर्शीपणे पार पडावी म्हणून  निवडणूक आयोगाने या वेळेस डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना मारहाण वा दमदाटी करण्याचा प्रकार होत असेल किंवा मतदारांना उमेदवाराकडून मतदान यंत्रापर्यंत सोडण्यासाठी वाहनांवर खर्च होत असेल तर थेट मतदारांना याविरुद्ध अ‍ॅपद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे.

 सी व्हिजिल या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांनी आॅनलाईन तक्रार केल्यास त्याचे नावही गुप्त ठेवण्यात येत आहे. अपंग मतदारांना मतदान केंद्रात आवश्यक असणाºया सुविधा देण्यासाठी त्यांच्या मदतीला पीडब्ल्यूडी अ‍ॅपही निर्माण करण्यात आले आहे. सी व्हिजिल या अ‍ॅपचा वापर निवडणूक अधिसूचनेच्या तारखेपासून मतदानाच्या दुसºया दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडीओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँड्रॉईड स्मार्टफोनद्वारे अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना तक्रार करता येईल. 

आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिकाने त्या घटनेचे छायाचित्र अथवा तीन मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा. जीपीएस प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हिडीओ या अ‍ॅपवर अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होईल.

अ‍ॅप वापरकर्त्यास सी व्हिजिल अ‍ॅपद्वारे आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मोबाईल नंबर आणि इतर व्यक्तिगत तपशील अ‍ॅप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत तक्रारकर्त्यास पुढील संदेश मिळत नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई केली जाते. तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होईल. अपंग मतदारांना मतदान नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी आदी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप निर्माण करण्यात आल्याची माहिती निवडणुक शाखा व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या  तयारीने जोर धरला आहे़ 

अशाप्रकारच्या तक्रारी दाखल करता येणार ...- मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेक न्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात सी व्हिजिल अ‍ॅपवर तक्रार करता येणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान