सोलापूर: बाहेर गेलात अन दाराची चावी हरवली, आत राहिलात अन लॅच लॉक लागलं, गाडीची चावी हरवली... मग काय करणार? की मेकर वाल्याकडे जाणार असाल तर तो तुमच्या ओळखपत्राशिवाय आणि खात्री केल्याशिवाय डुप्लीकेट चावी बनवून देणारच नाही. आता ओळखपत्र आणि वाहनांची कागदपत्रे पाहूनच दुसरी चावी देण्याची नियमावली कुलूप व्यवसायिकांनी पुढे आणली आहे.
सोलापूर शहरात लाखो घरं असून पोलिसांचे बळ सुरक्षेच्या बाबतीत कमी पडते. त्यामुळे सोलापूरकारांना स्वत:च्या घराची काळजी स्वत:ला जेवढी अधिक घेता येईल तेवढी स्वत:च्या संपत्तीची सुरक्षितता राहणार आहे. पोलिसांची गस्त असतानादेखील घरं फोडली जातात, चाेरटे घरासमाेरुन दुचाकी पळवतात. अशावेळी बनावट चाव्या बनवून घरं फोडल्याची काही उदाहरणं पुढे येत असल्याने व्यवसायात पारदर्शी असलेल्या की मेकर वाल्यांनी आता ओळखपत्र आणि कागपदत्रे पाहूनच दुसरी चावी बनवून देताहेत. विश्वाससाहर्ता वाढवत आहेत. अपार्टमेंटमध्ये ओळख सांगत आले घर फोडून सुरक्षा रक्षकासमोरुन गेलेकाही दिवसांपूर्वी भैय्या चौक ते देगाव दरम्यान एका अपार्टमेंटमधील एक कुटूंब घर बंद करुन बाहेर गावी गेले. त्याच्या दुस-या दिवसी काही तरुण आले. सुरक्षा रक्षक हटकताच बाहेर गावी गेलेले लोक नातेवाईक असून त्यांनी आम्हाला घरी पाठवल्याचे सांगून आत गेले. 'मास्टर की' वापरुन घर उघडले अन सारा ऐवज घेऊन सुरक्षा रक्षकांकासमोरुन पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी सुरक्षा रक्षकालाही गंडवल्याचा प्रकार पुढे येताच 'की' मेकर वाले सतर्क झाले अन नियमावली कडक केली.
बरेच अनोळखी लोक चावी हरवल्यानंतर दुचाकी ढकलत घेऊन येतात. त्या गाड्या त्यांच्याच आहेत का ? हे विचारणे देखील अवघड असते. परंतू पोलिसांच्या सूचनानंतर आता दुचाकी धारकाचे आधार कार्ड आणि कागदपत्रे पाहूनच दुसरी चावी बनवून देतो. ओळख पटल्याशिवाय चावी बनवत नाही. - अखलाख टंगसाल, चावी मेकर