कोरोनाचे दुसऱ्या लाटेत अत्यंत विदारक स्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत प्रशासन व ग्रामस्थांनी हातात हात घालून एकमेकांना विश्वासात घेऊन संकटावर मात करणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. त्यामुळे ज्या ज्या गावांत कोरोना रुग्ण आढळून येतात त्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना प्रशासनाच्या ताब्यात देणे, त्यांना कोरोना चाचणी करून घेण्यास परावृत्त करणे, त्या कुटुंबाची सोय निर्माण करणे, धीर देणे, अशा प्रकारची कामे स्थानिक समितीने करणे आवश्यक आहे. हेच अनेक गावांत होताना दिसत नाही. परिणामी तपासणी, लसीकरण यासारख्या मोहिमांना खीळ बसत आहे. यामुळे प्रत्येक गावात रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत.
या गावांत आहेत सर्वाधिक रुग्ण
समर्थनगर २९ रुग्ण असून, एकांचा मृत्यू झाला आहे. वागदरी १३ रुग्ण आहेत. शिरवळ येथे ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सांगवी बु. येथे ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून, एकाचा मृत्यू झाला आहे. नागणसूर येथे ८ रुग्ण आढळले आहेत, असे एकूण पाच गावांत दुसऱ्या लाटेत ६९ रुग्ण आढळून आलेले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे.
कोट ::::::::
नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी परावृत्त करावे. बाधित रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वाॅरंटाइन करण्यासाठी मदत करावी. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर करणे, फिजिकल डिस्टन्स ठेवून सहकार्य केल्यास गाव कोरोनामुक्त होईल.
- डॉ. आश्विन करजखेडे,
तालुका आरोग्य अधिकारी