सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी दुपारच्या सञांत मुळेगांव तांङा नंबर २ येथे अचानक हातभट्टी दारु अङ्यावर धाङ टाकून एकूण १४८० लिटर हातभट्टी दारुसाठी वापरण्यात येत असलेले रसायन जागीच नष्ट केले.
या मध्ये एकूणच ३ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने नष्ट केला. या कारवाई दरम्यान मुळेगांव तांङा नंबर २ येथील उपस्थित जमावाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांवर हल्ला केला.
या हल्ल्यात कर्मचारी प्रियंका कुटे जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ४ संशयितांना ताब्यात घेतले होते.काही वेळाने त्या संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने उशिरा सोङून दिले.
दरम्यान या बाबतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचारी प्रियंका कुटे यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी जबाबावरुन आरोपी अनामिका धनु राठोङ, प्रधान रामा राठोङ, अदी प्रधान राठोङ, टोपू धनु चव्हाण, अमन प्रधान राठोङ सर्वच जण रा.भानुदास तांङा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हल्ल्यात जखमी कर्मचारी प्रियंका कुटे यांची तब्येत आता चांगली असल्याची माहिती सूञांकङून सांगण्यात आली. या प्रकरणाचा आता सोलापूर तालुका पोलिसांकङून कसून तपास करण्यात येतोय.