याप्रकरणी पोलिसांनी बुधानंद तुकाराम बाबर, करणसिंग गौड, बापूसाहेब गुजले (तिघे रा. पारे, ता. सांगोला), गोरख जगन्नाथ लवटे (रा. वाकी घेरडी) व दत्तात्रय पांडुरंग पोळ ( रा. घेरडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस सचिन देशमुख, बाबासाहेब पाटील, भाऊसाहेब देशमुख यांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या पारे येथील बुधानंद तुकाराम बाबर याच्याकडून ७८० रुपयांची, करणसिंग अमरसिंग गौड याच्याकडून १,३३४ रुपयांची देशी-विदेशी दारू, तर बापूसाहेब गुजले याच्याकडून १,२४८ रुपयांची देशी दारू जप्त केली. तसेच वाकी घेरडी येथील गोरख लवटे याच्याकडून १,०६८ रुपयांची व घेरडी येथील दत्तात्रय पांडुरंग पोळ या्च्याकडून १५,७८० रुपयांची अशी एकूण २०,२१० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली.
-----