याबाबद अधिक माहिती अशी की, बुधवार-गुरुवारच्या पहाटे एक ते दोनच्या दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे विशेष पथक राळेरास येथील नागझरी नदीजवळ पेट्रोलिंग करत होते. यावेळी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाल्यावरून होती. पोलिसांना संबंधित ठिकाणी काही लोक दोन टेम्पोमध्ये वाळू भरत असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून गेले.
घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता जागेवर भाऊसाहेब पंके (रा. राळेरास) तेथे आढळून आला. यावेळी त्याने चालकानी नावे सांगितली नाहीत. या धाडीत प्रत्येकी ३० हजार ५०० किमतीचे दोन वाहने, भाऊसाहेब आण्णासाहेब पंके यांच्या मालकीची एम. एच. डी. डी. ०५३६ ३० हजार रुपयांची दुचाकी, अन्य साहित्य असा ६ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत चिमाजी हेंबाडे यांनी भाऊसाहेब पंके, गणेश भोसले व दोन फरार चालका विरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा नोंदला आहे.
----