अक्कलकोट : हिळळी (ता.अक्कलकोट) परिसरात एक विनाक्रमांकाचा टेम्पो विनापरवाना वाळू भरून वाहतूक करताना तहसीलदार यांच्या फिरत्या पथकाने पकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रात्रीच्या वेळी एक लाल रंगाचा विनाक्रमांकाचा टेम्पो एक ब्रास वाळू भरून घेऊन निघालेला होता. फिरत्या पथकातील अव्वल कारकून संजय सोनटक्के, तलाठी नुरद्दीन मुजावर, शावळ येथील कोतवाल माने यांच्या पथकाने पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आला. यानंतर एकूण वाळूच्या किमतीच्या पाचपट दंड ठोठावण्यात आला. तब्बल १ लाख ३६ हजार रुपयांचा दंड लावला आहे.
----
अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र अवैध वाळू उपसा बंद असल्याचे सांगितले जाते. तरीही सिंनुर, दुधनी, शिरवळवाडी, तोळनूर, बबलाद, हिळळी, नागणसूर अशा काही भागात कर्नाटकातून अवैधरित्या वाळू आणून चढ्या दराने विक्री केली जात आहे. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत अशापद्धतीने वाळू उपसा केला जात आहे.
--
फोटो : १० अक्कलकोट
हिळळी येथे रात्री अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा विनाक्रमांकाचा टेम्पो तहसील कार्यालयाच्या पथकाने पकडला.