पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील विशेष पोलीस पथकाचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, पोलीस कॉन्स्टेबल मनोज राठोड, कल्याण भोईटे, सतीश एनगुले यांच्या पथकाने म्हैसगाव-शिराळा बंधाऱ्यावर छापा मारला. तेव्हा तीन ट्रॅक्टर, एक टेम्पो आढळला. शिवाय येथून चौघे पळून गेले तर चार जणांना ताब्यात घेतले. सागर सोमनाथ बोरकर (वय २०), संतोष शिवाजी बोरकर (वय ३४), दीपक महादेव जगताप (वय ३२), वरील सर्वजण रा. म्हैसगाव, तर योगेश यशवंत गिरी (वय ३०, रा. बारलोणी) अशी त्यांची नावे आहेत. टेम्पो हा बंडू सरवदे (रा. म्हैसगाव) यांचा असल्याचे सांगितले. कॉन्स्टेबल मनोज राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांवर कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन ब्रास वाळूसह एकूण २१ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बेकायदेशीर दोन ब्रास वाळू जप्त; आठ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:55 AM