सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगवी खुर्द व सांगवी बुद्रुक या पुलाची पाहणी केली. या वेळी शेतकºयांशी त्यांनी संवाद साधला. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोते, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकºयांची निवेदने स्वीकारली. तसेच ११ शेतकºयांना मदतीचा धनादेश सुपूर्द केले.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तर एकाच या भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौºयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौºयावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करण्यासाठी आले. मात्र शेतकºयांची मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी. यावेळी नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागताला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि माजी आमदार दिलीप माने हे उपस्थित होते. कोरोनामुळे उर्वरित पदाधिकाºयांना विमानतळाबाहेर थांबवण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत आदी उपस्थित होते.