वडाळा ग्रामीण रुग्णालयातील वस्तुस्थिती गुरुवारी पाहणी करून डाॅ. बी. टी. दुधभाते यांनी अहवाल सिव्हिल सर्जनला दिला. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवा, ॲम्ब्युलन्स व इतर समस्यांबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर वस्तुस्थिती पाहण्यासाठी गुरुवारी डाॅ. बी.टी. दुधभाते वडाळा ग्रामीण रुग्णालयात आले होते. सिव्हिल सर्जन ढेले यांच्या सूचनेनुसार डाॅ. बी. टी. दुधभाते यांनी सिझर सुविधा बंद असल्याचा अहवाल सादर केला. या भागातील लोकांना चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असून बाळंतपण सिझर शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे ढेले यांनी सांगितले. एक- दोन आठवड्यात येथे सर्व आरोग्य सेवा सुरू होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही नव्याने डाॅक्टरांची नेमणूक करू शकत नसल्याचेही डाॅ. ढेले यांनी सांगितले.
----
चालकाची मागणी केलीय..
जिल्ह्यातच चालक नेमणुकीचा विषय असून, आठ चालक मदतीसाठी परवानगी मागितली आहे. आठ ऐवजी १६ चालक नियुक्त केले तर २४ तास सेवा देता येईल, असे डाॅ. ढेले म्हणाले.
----
पदभार घोरपडेंकडेच राहील
अधीक्षक पदाचा अंतर्गत वाद असल्याने वडाळा ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. पदभार घोरपडे यांच्याकडेच राहील, असे डाॅ. ढेले यांनी सांगितले.
----