शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सोलापुरात दिवसेंदिवस वाढतेय ‘योगा’चे महत्त्व भल्या सकाळी बागा, तलाव परिसर हाऊसफुल्ल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:17 PM

International Yoga Day 2019 : धावपळीच्या जीवनामुळे वाढतेय महत्त्व ; निरोगी जीवनशैली आत्मसात करण्याकडे कल

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव २७ सप्टेंबर २०१४ च्या महासभेत आलाबाबा रामदेवांनी २००६ पासूनच विविध देशांमध्ये योग शिबिरे घडवून आणल्यामुळे योगाचे महत्त्व ज्या-त्या देशांमधील नागरिकांनी जाणले ११ डिसेंबर २०१४ च्या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या महासभेत दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला १९३ देशांपैकी १७७ देशांनी एकमताने मान्यता दिली

सोलापूर : धावपळीचे जीवन, वाढते ताणतणाव यावर मात करून निरोगी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी आज योगाचे महत्त्व वाढत असून, सोलापुरातही दिवसेंदिवस योगाकडे लोकांचा कल वाढत आहे. पहाटेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत  बागा, तलाव परिसर हाऊसफुल्ल होत आहेत.

गेल्या काही वर्षांत योगाचे महत्त्व सांगणाºया अनेक संस्था सोलापुरात अस्तित्वात आल्या आहेत. एकट्या एकट्याने साधना व ध्यानधारणा करणाºयांची संख्याही वाढत आहे.

सोलापुरातील खंदक बगीचा, हुतात्मा बाग, धर्मवीर संभाजी तलाव परिसरातील बाग, मार्कंडेय उद्यान, विणकर बाग, जुळे सोलापूर या प्रमुख ठिकाणी योग करणाºयांची वाढती गर्दी लक्षात घेतली तर आज प्रत्येकाच्या जीवनात किती ताणतणाव आहे, हे तर दिसतेच. त्याबरोबरच आरोग्याबद्दलची जागरुकताही वाढलेली दिसून येते. शहरातील सर्व भागात स्वयंस्फूर्तीने योगा करणाºयांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे.

हरळी प्लॉट योगासन मंडळखंदक बगीचा येथील हरळी प्लॉट योगासन मंडळ गेल्या ४० वर्षांपासून योग जनजागृतीचे कार्य करीत असून या मंडळाचे १४० सभासद आहेत. पहाटे साडेपाच ते सात अशी यांची योगसाधनेची वेळ आहे. योगाबरोबरच ओंकार आणि सत्संग, भावगीते, भक्तीगीते, प्रबोधन, हास्यविनोद यावरही हे मंडळ भर देते. या सर्व गोष्टी जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे या साधकांचे मत आहे.

सिद्धिविनायक योग व प्राणायाम वर्गहुतात्मा बागेतील पतंजली योग समिती संचलित  श्री सिद्धिविनायक योग व प्राणायाम वर्ग गेल्या १० वर्षांपासून योगाचे धडे देतेय. या वर्गात ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आजपर्यंत एक हजारांहून अधिक साधकांनी या वर्गाचा लाभ घेतला आहे.सकाळी सहा ते साडेसात अशी या वर्गाची वेळ असून यात प्रार्थना, व्यायाम, आसने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, शांतीपाठ टाळ्या आणि हास्य आदी उपक्रमांचा समावेश आहे. येथे रोज एक विनोद सांगितला जातो व त्यावर हसण्याचा हा व्यायाम पार पडतो.

सिद्धेश्वर प्रभात शाखाहुतात्मा बागेतील सिद्धेश्वर प्रभात शाखा तीन वर्षांपूर्वी स्थापन झाली असून योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार येथे नियमित घेतले जातात. सुरेश इराबत्ती, बाबुलाल वर्मा हे प्रशिक्षक सर्वांना योगसाधनेचे धडे देतात.

हरिओम विणकर बाग संस्थापूर्व भागातील हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्था १० वर्षांपूर्वी सुरु झाली असून  सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत येथे योगसाधना केली जाते. विनायक सिद्धम हे संस्थेचे अध्यक्ष तर लक्ष्मीकांत दंडी हे उपाध्यक्ष आहेत.

मार्कंडेय उद्यान योगा ग्रुपपूर्व भागातील मार्कंडेय योगा ग्रुप ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असून संस्थेचे ३५ सभासद आहेत. पहाटे साडेपाच ते साडेसहा ही यांची योगसाधनेची वेळ आहे.

पृथ्वी प्राणायाम वर्गजुळे सोलापुरातील पतंजली योग समिती संचलित पृथ्वी प्राणायाम वर्ग ही संस्था २००८ पासून योगाचे धडे देत आहे. नगरसेविका संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सहा ते सात या वेळेत मोफत व कायमस्वरुपी योगसाधना व प्राणायामचे आयोजन करण्यात येते.

संभाजी तलाव प्राणायाम संघधर्मवीर संभाजी तलाव अर्थात कंबर तलाव परिसरात असलेल्या संभाजी तलाव प्राणायाम संघाची स्थापना ४ डिसेंबर २००४ रोजी झाली असून संघाचे एकूण २५ सभासद आहेत. प्राणायाम, आसने यावर या संघाचा मुख्य भर असून सकाळी सहा ते साडेसात अशी यांची वेळ असते.

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या महासभेत मान्यता- योग, प्राणायाम केल्याने आयुष्य तर वाढतेच आणि ते सुंदरही बनते. हाच धागा पकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव २७ सप्टेंबर २०१४ च्या महासभेत आला. बाबा रामदेवांनी २००६ पासूनच विविध देशांमध्ये योग शिबिरे घडवून आणल्यामुळे योगाचे महत्त्व ज्या-त्या देशांमधील नागरिकांनी जाणले आहे. त्यामुळेच ११ डिसेंबर २०१४ च्या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या महासभेत दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला १९३ देशांपैकी १७७ देशांनी एकमताने मान्यता दिली. 

योग म्हणजे काय ?

  • - जीव आणि विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती म्हणजे शिव आणि त्यांचे एकत्रीकरण म्हणजे योग. आधुनिक शास्त्राप्रमाणे हे विश्व म्हणजे एकाच तरंगलहरीच्या विविध रुपांचे दर्शन होय. ज्या कुणाला विविधतेमधील या एकत्वाची जाणीव झाली तो योगी. त्याने प्राप्त केलेली जीवनाची अवस्था म्हणजे मुक्ती किंवा निर्वाण किंवा कैवल्य, मोक्ष होय. 
  • - आत्मसाक्षात्कार घडविण्यासाठी शरीर व मन यांचे एकत्रीकरण साधण्याच्या विविध मार्गांचे अंतरंग शास्त्र योग उलगडून दाखविते. जीवनाचे अंतिम उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून खरा आणि शाश्वत आनंद मिळविण्याचा योग हा एक मार्ग होय. 

२१ जूनचे महत्त्व

  • - २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस आहे. या दिवसापासून दक्षिणायन सुरू होते. या काळात केलेली योगसाधना ही जास्त प्रभावी असते म्हणून हा दिवस योग दिवस निवडला गेला. योगसाधनेमुळे मानवी जीवनाच्या सर्व अंगांमध्ये एकवाक्यता निर्माण होत असते. 
टॅग्स :SolapurसोलापूरYogaयोगInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका