सोलापूर : शहरातील कचरा उचलण्याच्या कामात त्रुटी आढळत असल्याने त्यात सुधारणा झाली पाहिजे, येत्या १५ दिवसात जास्तीत जास्त कचरा उचलला पाहिजे, असे सांगत येत्या २५ मेपर्यंत या कामाचा अहवाल सादर करा असा आदेश आरोग्य विभागाचे मुख्याधिकारी डॉ. श्रीकांत वैद्य यांनी दिला. शहरातील कचरा उचलण्यासंदर्भात महापालिकेत शनिवारी समीक्षा कन्स्ट्रक्शनची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी समीक्षा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर किशोर गीते, शोएब सैफअली खान, अमित रेवाळे, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशावरून घेण्यात आलेल्या या बैठकीत डॉ. श्रीकांत वैद्य यांनी समीक्षा कन्स्ट्रक्शनच्या कामाचा आढावा घेतला. शहरात कचरा उचलण्यासाठी १ हजार २२५ ठिकाणे सांगण्यात आली आहेत. काही ठिकाणी एकाच दिवसात ४ वेळा कचरा उचलण्यासाठी जावे लागते. घंटागाडीमुळे शहरातील बर्यापैकी कचर्याची समस्या नष्ट झाली असली तरी काही ठिकाणी समस्या अद्याप कायम आहे. याबाबत डॉ. श्रीकांत वैद्य यांनी समीक्षा कन्स्ट्रक्शनच्या अधिकार्यांना विचारले असता त्यांनी तांत्रिक अडचणी सांगितल्या. समीक्षा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर आणि आरोग्य निरीक्षक यांच्यात समन्वय होत नाही, तो झाला पाहिजे असेही यावेळी वैद्य यांनी सांगितले. येत्या १५ दिवसात यंत्रसामुग्री वाढवून कामात गती आणणार असल्याचे समीक्षाच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर डॉ. श्रीकांत वैद्य यांनी या कामाची आढावा बैठक दि.२५ मे रोजी घेतली जाईल असे सांगितले. (प्रतिनिधी) ‘समीक्षा’ कचरा उचलेना शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दिलेल्या समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याबद्दल तक्रारी वाढू लागल्या आहेत़ ज्या भागात कचरा उचलला जात नाही त्या बदल्यात मोठा दंड लावण्यास सुरुवात झाली आहे़बिलावर दंड सुरू केला आहे़ त्यामुळे आता त्यांनी बिल सादर करण्याऐवजी अॅडव्हान्स घेणे सुरू केले आहे़ दोन दिवसांपूर्वी केलेल्या संपामुळे त्यांना २़४५ लाखांचा दंड करण्यात आला आहे़ मक्तेदार समीक्षा कन्स्ट्रक्शन समवेत शनिवारी आयुक्तांनी बैठक आयोजित केली आहे़ कौन्सिल हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरेचे काही अज्ञात व्यक्तींनी केबल काढले असून याबाबत पोलिसात फिर्याद देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत़ मनपा परिसरात तब्बल २७५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत़
--------------------
कचरा उचलण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत समीक्षाच्या कामांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांना योग्य सूचना करून कामासंदर्भात उपाय सुचवण्यात आले आहेत. - डॉ. श्रीकांत वैद्य, मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, महापालिका.
----------------------------------
शहरात सध्या दररोज २२५ ते २५0 टन कचरा निर्माण होतो त्यापैकी फक्त २00 ते २१0 टन कचरा उचलला जातो. आणखी घंटागाड्या वाढवणार असून येत्या १५ दिवसात पुन्हा काम सुरळीत होईल. - किशोर गीते, सुपरवायझर, समीक्षा