सोलापूर : जॉब शोधण्यासाठी जाते म्हणून सकाळी आईला सांगून बाहेर पडलेली मुलगी सायंकाळ होऊनही परत न आल्याने पित्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. सुमित्रा गणेश बोरगावकर असे या मुलीचं नाव आहे. तर आणखी एक तरुणी घरात किरकोळ वाद झाल्याच्या निमित्तानं गायब झाली आहे. रुतूजा अविनाश जाधव असं तिचं नाव असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितले.
मुलीचे पिता गणेश बोरगावकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची मुलगी सोमवारी सकाळी १०:३०च्या सुमारास तिच्या आईला जॉब शोधण्यासाठी जात आहे, असे सांगून बाहेर पडली. सायंकाळनंतरही ती घरी न परतल्याने सारेच काळजीत पडले. तिच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंद होता. नातलगांकडे, मैत्रिणींकडे शोध घेऊनही ती सापडली नाही.
अखेर पित्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या मुलीचे वय १७ वर्षे ८ महिने १८ दिवस असून, तिला कोणीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित मुलीसंदर्भात माहिती मिळाल्यास एमआयडीसी पोलिस ठाण्यास संपर्क साधावा, असे आवाहन हवालदार डोके यांनी केले आहे. पुढील तपास ते स्वत: करीत आहेत.ठाण्यासमोरून तरुणी गायबघरामध्ये झालेल्या किरकोळ भांडणावरून ऋतुजा अविनाश जाधव (वय २६, रा. बुधवार पेठ, साठे चाळ, सोलापूर) ही तरुणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यासमोरून निघून गेली आहे. या प्रकरणी तिची आई रति जाधव यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. - सुमित्रा बोरगावकर, रुतुजा जाधव