सोलापूर - काॅंग्रेसच्या दाेन ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये साेमवारी दुपारी जाेरदार हाणामारी झाली. शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी दाेघांची समजून काढून विषयावर पडदा पाडल्याचे कार्यकर्त्यांनी मंगळवारी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, काॅंग्रेस भवनात दुपारी देवा गायकवाड नावाचे पदाधिकारी बसले हाेते. यादरम्यान अनिल म्हस्के नावाचे कार्यकर्ते आले. माझ्या भागातील कार्यकर्त्यांना इकडे कशाला आणताे. तुला काय लय भारी लागून गेला का? अशा शब्दांत वाद सुरू झाला. काॅंग्रेस शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी दाेघांनीही समजावून सांगितले. मात्र, वाद काही केल्या थांबेना. कार्यकर्ते एकमेकांना हाणामारी करू लागले. पुन्हा नराेटेंनी हस्तक्षेप करून थांबविले. तरीही दाेघांमधील वाद सुरू राहिला. पुन्हा हाणामारी झाली.
एकमेकांच्या प्रभागात लक्ष घालणे, कार्यकर्त्यांची फाेडाफाेडी करणे या कारणांवरून वाद झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणामुळे काॅंग्रेस भवनातील वातावरण सायंकाळपर्यंत तणावपूर्ण हाेते. शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी या दाेघांमध्ये समेट घडवून आणला. सर्वांना फाेटाेसेशन करुन वादावर पडदा पडल्याचे जाहीर केले.