सोलापूर - घराला कुलूप लाऊन कुर्डूवाडी येथे बँकेत पैसे काढण्यासाठी आले आणि तिकडे दाराची कडी कोयंडा तोडून ७४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना २९ मे रोजी सकाळी ११ ते दु.२.१५ वा. दरम्यान माढा तालुक्यात म्हैसगाव येथे घडली. याबाबत सुभाष ज्ञानदेव उबाळे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार फिर्यादी उबाळे हे म्हैसगाव येथील घराला कुलूप लावून पत्नीसह सकाळी ११ वा .कुर्डूवाडी येथे बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. फिर्यादी कुर्डूवाडी येथील कामकाज उरकून दु. २.१५ वा सुमारास म्हैसगाव येथे घरी परतले असता घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसला.
घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून लाॅकर मधील ४० हजार रुपये किंमतीचे १ तोळा वजनाचे मिनीगंठन, २० हजारांचे अर्धा तोळा सोन्याची अंगठी, २ ग्रॅम वजनाची कर्णफुले व रोख ६ हजार रुपये असा एकूण ७४ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.