सोलापूर : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचे डोके भिंतीवर आदळले तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत साधना सचिन दलभंजन ( वय ४२, रा. साखर पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी साधना यांचा २०१२ मध्ये सचिन दलभंजन याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर त्याच्या कुटुंबियांनी साधना यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांचे डोके भिंतीवर आपटले. शिवाय त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी १ लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केला, अशा आशयाची फिर्याद साधना यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती सचिन दलभंजन, विजया दलभंजन, नितीन दलभंजन, दीपाली दलभंजन ( सर्व रा. गोदावरी अपार्टमेंट, सिंहगड रोड, पुणे) यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.