शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

दोन दुचाकींची समोरासमाेर धडक; तरूण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

By रूपेश हेळवे | Published: March 23, 2023 3:49 PM

डॉक्टरांनी राजकुमार गंदले यांना मृत घोषित केले. तर कोळी याच्यावर उपचार सुरू आहेत

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरून तरुण गंभीर जखमी झाला आहे. राजकुमार शरणप्पा गंदले ( वय ४०, रा. मुंढेवाडी, ता. अक्कलकोट) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

गुरूवारी सकाळी मृत राजकुमार हे आपल्या दुचाकीवरून मुंढेवाडी ते तडवळकडे दुचाकीवरून जात होते. तेव्हाच मुंढेवाडी पासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर सचिन शिवानंद कोळी ( वय २५, रा. मुंढेवाडी, अक्कलकोट) हा तडवळ ते मुंढेवाडीकडे दुचाकीवरून येत होता. त्यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या गंभीर अपघातात राजकुमार हे जागेवरच रक्तबंबाळ अवस्थेत बेशुध्द पडले. तर कोळी हा गंभीर जखमी झाला. त्या दोघांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी राजकुमार गंदले यांना मृत घोषित केले. तर कोळी याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात