शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

आठवड्यात घरातील दुसरा भाऊही तडीपार! गुन्हेगारी विश्वात खळबळ; दंगे, गुंडगिरीचा आरोप

By रवींद्र देशमुख | Published: April 04, 2024 6:51 PM

सौदागर क्षीरसागर याला साेलापूर जिल्हा व धाराशीव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.

रवींद्र देशमुख/सोलापूर

सोलापूर : शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आठ दिवसात एकाच घरातील दुसऱ्या भावालाही शहर पोलिस आयुक्तालयाने दोन जिल्ह्यातून तडीपार केले.  सौदागर सुधीर क्षीरसागर (वय ३२ रा. न्यू बुधवार पेठ, वीरफकीरा चौक सोलापूर) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. सौदागर क्षीरसागर याच्या विरूद्ध २०११ ते २०२३ दरम्यान गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे, जीवे ठार मारणे, नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून गंभीर दुखापत करणे.

महिलेस लज्जा वाटेल असे कृत्य करणे या सारखे गुन्हे जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या विरूद्ध जोडभावी पेठ पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त (परिमंडळ) यांच्याकडे पाठवला होता.

सौदागर क्षीरसागर याला साेलापूर जिल्हा व धाराशीव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. तडीपार केल्यानंतर त्याला पोलिसांनी निगडी, पिंपरी चिंचवड येथे सोडले आहे. यापूर्वी २६ मार्च रोजी याचा भाऊ सतीश सुधीर क्षीरसागर यालाही दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. आठ दिवसात दोघांना तडीपार केल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.