शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

अनावधानाने माझी चूक झाली, डिसले गुरुजींचा ZP ला 10 ओळीत माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 11:19 AM

अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी डिसले यांना जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी हवी होती.

सोलापूर - ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले गुरुजी गेल्या आठवड्यात रजेच्या परवानगीवरून चर्चेत आले होते. पीएचडी करण्यासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी प्रलंबित ठेवली म्हणून डिसले यांनी प्रशासनावर मानसिक त्रास व पैसे मागणीचा आरोप केला होता. यावर आरोपाच्या खुलासा करण्यासाठी जिल्हा परिषदेने नोटीस बजाविल्यावर डिसले गुरूजींचे विमान जमिनीवर आले आहेत. त्यांनी या आरोपाबाबत प्रशासनाची माफी मागितल्याचे आता स्पष्ट झालं. जिल्हा प्रशासनाने डिसले गुरुजींचा हा खुलासा शिक्षण विभागाकडे पुढील चौकशीसाठी पाठविला आहे.

अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी डिसले यांना जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी हवी होती. दीड महिना शिक्षण विभागाने अर्ज प्रलंबित ठेवला, मानिसक त्रास दिला व पैशाची मागणी केली असा त्यांनी केलेला आरोप व मागील तक्रारीवरून चौकशी समितीने सादर केलेला अहवाल या दोन्ही कारणांनी राज्यभर वादळ उठले होते. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेत करीत जिल्हा परिषद प्रशासनाला तत्काळ परवानगी द्यायला लावली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. प्रसारमाध्यमांसमोर डिसले गुरुजींनी केलेला आरोप प्रशासनाने गांभीर्याने घेतला.

मानसिक छळ कोणी केला व पैसे कोणी मागितले, अशी सीईओ दिलीप स्वामी यांनी त्यांना नोटीस बजावली. यामुळे डिसले गुरुजींच्या अडचणींत वाढ झाली व त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हा प्रशिक्षण संस्था व विज्ञान केंद्रात हजर राहून प्रशिक्षण दिले का, हा वादाचा मुद्दा पुढे आला. डिसले गुरुजींनी आरोपांबाबत प्रशासनाची माफी मागितल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. ‘आता यापुढे मी प्रसारमाध्यमांपुढे जाणार नाही,’ अशी भूमिका जाहीर करीत प्रकरण थांबविण्याची त्यांनी विनंती केली. त्यांच्या माफीनाम्याची चर्चा आता जिल्हा परिषदेत रंगली आहे. पण या वादाच्यानिमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना डिसले गुरुजींचे उत्तर काय असणार आहे, याकडेही लोकांचे लक्ष लागले आहे.

एकच पानी पत्र दिले

जिल्हा परिषदेच्या नोटीशीनंतर डिसले यांनी मंगळवारी एक पानी पत्रातून उत्तर दिले. यात त्यांनी केलेल्या आरोपाबाबत माफी मागितली आहे. यापुढे मी प्रसारमाध्यमापुढे जाणार नाही. मी अनावधानाने आरोप केला, असेही त्यांनी नमूद केले आहे. 5 ते 10 ओळीत डिसले गुरुंजींनी आपले म्हणणे मांडल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले. 

पत्र शिक्षण विभागाकडे वर्ग

डिसले यांनी चौकशीला दिलेले उत्तर हे पुढील चौकशीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. शिक्षण अधिकारी लोहार हे या पत्राबाबत खातरजमा करतील व अहवाद सादर करतील. त्या अहवालावर पुढील निर्णय घेतला जाईल.  

टॅग्स :Ranjitsinh Disaleरणजितसिंह डिसलेzp schoolजिल्हा परिषद शाळाSolapurसोलापूर