बार्शी
: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरातील
काही ठिकाणी भेट देऊन कोरोना परिस्थितीची पाहणी करून पोलीस अधीक्षक
तेजस्वी सातपुते यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यातील विश्रांती कक्षाचे
उदघाटन केले. यावेळी आगामी काळात कोरोना संसर्गाबाबत, समस्यांबाबत
बार्शी उपविभागीय पोलीस कार्यालय येथे उपविभागीय पोलीस अधिकारी व बार्शी
विभागातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना देण्यात
आल्या.
या बैठकीस बार्शी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत
धाराशिवकर, बार्शी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष गरीगोसावी उपस्थित
होते. त्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाणे येथे कायदा व सुव्यवस्थाच्या
अनुषंगाने बाहेरील पोलीस ठाणेहून येणारे पोलीस अंमलदार यांना विश्रांतीसाठी
हे पोलीस विश्रांती कक्ष सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
---
०५ तेजस्वी सातपुतेबार्शीत पोलीस विश्रांती कक्षाचे उद्घाटन करताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते
----