आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : ग्रामीण भागात शाळा आणि सार्वजनिक वाचनालये समाजाला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात म्हणूनच माज्या खासदार निधीतून या कामांना मोठा निधी दिला ,अशा संस्थामुळे सुदृढ विचारांची पिढी निर्माण होते , असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी चुंगी येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या विस्तारीत इमारतींचे उदघाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे होते.व्यासपीठावर लोकमतचे संपादक राजा माने ,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके ,जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप चाकोते , सोलापूर डिसीसी बँकेचे संचालक सुरेश हसापुरे ,सोलापूर मनपाचे पक्षनेते चेतन नरोटे ,माजी सभापती श्रीशैल नरोळे ,वाचनालयाचे संस्थापक प पू गोरक्षनाथ महाराज ,चुंगीच्या सरपंच आशाराणी गड्डे आदींची उपस्थिती होती प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष नारायण चव्हाण यांनी प्रास्ताविकातून वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी बोलताना शिंदे म्हणाले , अनेकदा दिलेला निधी त्याच कामासाठी खर्च होत नाही,हा आपला अनुभव आहे , शाळा आणि वाचनालयांना दिलेला निधी सत्कारणी लागतो .अशा संस्थांना शासन मदतीची गरज असते आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी तालुक्यात केलेल्या बोरी धरण ,आठ एकरचा स्लॅब रद्द करणे ,एकरुख योजनेचा सुप्रमा आदी कामी शिंदे यांनी झुकते माप दिल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली .यापुढच्या काळात एकरुख योजना मार्गी लावण्यासाठी आपण लक्ष्य केंद्रित करणार असल्याचे त्यानि सांगितले लोकमतचे संपादक राजा माने यांनी चुंगी येथील विविध उपक्रमांचे कौतुक करीत उत्कर्ष वाचनालयाच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या . उमेशचंद्र काजळे ,हरिदास जाजनुरे ,लक्ष्मी जाधव यांचा सेवनिवृतिनिमित्त सत्कार करण्यात आलं. अशोक काजळे यांनी भाषण केले.पत्रकार दत्ता थोरे यांनी आभार मानले.कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे ,व्यंकट मोरे ,?ड बापूसाहेब देशमुख , सुरेश माने ,माजी सरपंच सुभद्रा रेड्डी , प्रहार संघटनेचे राजसाहेब चव्हाण ,संजीव पाटील ,बालाजी माने ,विश्वनाथ भोसले ,नारायण धुमाळ ,सैफन शेख ,विनोद थोरे ,निवृत्ती चव्हाण , संजय मठ ,जनार्धन चव्हाण ,यांची उपस्थिती होती
वाचनालये आणि शाळा समाजाची ऊजाकेंद्रे, सुशिलकुमार शिंदे यांचे मत, चुंगी येथे उत्कर्ष वाचनालयाच्या इमारतीचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 3:29 PM
ग्रामीण भागात शाळा आणि सार्वजनिक वाचनालये समाजाला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात म्हणूनच माज्या खासदार निधीतून या कामांना मोठा निधी दिला ,अशा संस्थामुळे सुदृढ विचारांची पिढी निर्माण होते , असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी चुंगी येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले
ठळक मुद्देअक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या विस्तारीत इमारतींचे उदघाटन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी तालुक्यात केलेल्या बोरी धरण ,आठ एकरचा स्लॅब रद्द करणे ,एकरुख योजनेचा सुप्रमा आदी कामी शिंदे यांनी झुकते माप दिल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केलीलोकमतचे संपादक राजा माने यांनी चुंगी येथील विविध उपक्रमांचे कौतुक करीत उत्कर्ष वाचनालयाच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या .