अक्कलकोट : समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीत विविध ठिकाणी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा शुभारंभ माजी सरपंच प्रदीप पाटील यांच्या हस्ते झाला.
ब्यागेहळळी रोड - शकील पठाण घर हा ६४ मीटर लांबीचा व दहा फूट रुंदीचा रस्ता, शाब्दी फॉर्महाउस ते वकील बोराळकर यांच्या घरापर्यंत असा दोन ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित होता.
माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी जनसुविधा योजनेतून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मिळवला. यावेळी उपसरपंच लाला राठोड, सदस्य सचिन गजधाने, गुरुनाथ नरुणे, शिवाजी मुसळे, चंद्रकांत भोसले, चंद्रकांत गुरव, डॉ. प्रदीप बिराजदार, विनोद राठोड, प्रदीप गुरव उपस्थित होते.
---
ग्रामपंचायत स्थापन होऊन दहा वर्षे झाली. येथील नागरिक चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत होते. रस्त्याचे कामे पूर्णत्वास येत आहे.
- दीपक गुरव, ग्रामस्थ
---
आणखीन काही कामे होणे अपेक्षित आहे. निधीअभावी ती प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागण्यासाठी विद्यमान आमदारांकडे पाठपुरावा चालू आहे. मिळालेल्या कालावधीत पाणीपुरवठ्यासह महत्त्वाची सर्व कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.
- जयश्री पाटील, सरपंच, समर्थनगर
---
----
फोटो : ०१ समर्थ नगर
समर्थनगर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करताना प्रदीप पाटील, लाला राठोड, दीपक गुरव.