यावेळी तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, प्रा. पी. सी. झपके, नगराध्यक्ष राणी माने, पं. स. सभापती राणी कोळवले, माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळेकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता अशोक मुलगीर, तालुका क्रीडा अधिकारी सतेन जाधव, सदस्य शहाजी घाडगे, सुनील भोरे, भारत इंगवले उपस्थित होते.
सध्याच्या धावत्या युगात तरुणांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. सध्याचा आहार हा रसायनयुक्त व पौष्टिकता कमी असलेला असल्याने तरुणांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे आपले आरोग्य व शरीर सदृढ व निरोगी राखण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तरुण व नागरिकांना आधुनिक व्यायाम साहित्याचा लाभ मिळावा, यासाठी या व्यायामशाळेत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितले.