बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर: लोककलेच्या माध्यमातून संतांनी सामाजिक प्रश्न तसेच समस्यांवर प्रभावीपणे समाज प्रबोधन केले होते. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी शासनाच्या स्वच्छता तसेच विविध योजनांचा प्रचार-प्रसिद्धीसाठी लोककलेचा वापर केला पाहिजे. त्या माध्यमातून अनेक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी केले.
सोमवारी, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य ब्रँड अँबेसिडर (सदिच्छा दूत) प्रिया पाटील, विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. विकास पाटील, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे, समन्वयक डॉ. केदारनाथ काळवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"