कुसळंब : जामगाव (आ) ग्रामपंचायतीने उभारलेल्या आरओ प्लांट उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मागील वर्षी हे गाव रेडझोनमध्ये होते याची आठवण करून देत, आता हे गाव कोरोनापासून दूर असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालयाशेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह या ठिकाणी सुरू असलेले कोविड केअर सेंटरचे रूपांतर करणे, येथील सुसज्ज इमारतीत ५५ बेड्स (डेडिकेटेड कोविड सेंटर) हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री खरेदीसाठी ५० लाखांचा आमदार निधी तातडीने उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जामगाव ग्रामपंचायतीने उभारलेल्या या जलशुद्धीकरण प्रकल्पातून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी एटीएम कार्डाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या एटीएम कार्डचा वापर करून, अवघ्या पाच रुपयात नागरिकांना २० लीटर शुद्ध पाणी दिले जाणार असल्याची माहिती सरपंच गंगाबाई जगताप यांनी यांनी दिली.
यावेळी सरपंच गंगूबाई जगताप, बाळासाहेब जगताप, उपसरपंच विष्णू आवटे, तुकाराम गडदे, बाळासाहेब जाधव, ग्रामसेवक एन.आर. माळवे, रमेश आवटे, अमर ठोंबरे, सदस्य प्रिया गडदे, अनुराधा कागदे, शीतल अडसूळ, विजय आवटे, वैजनाथ आवटे, गुणवंत खुरुगळे, सुनील खुरुंगळे, बालाजी कागदे, बबन ननवरे, बाळ कागदे, विठ्ठल चित्राव, आश्रम कावे, आकाश जगताप, नंदकुमार आवटे, बजरंग गडदे, धनंजय जळकुटे, उत्तरेश्वर इंगळे ग्रामस्थ उपस्थित होते.
----
०४ जामगाव
जामगाव येथे आरओ प्लांटचे उद्घाटन करताना, आमदार राजेंद्र राऊत, गंगूबाई जगताप, विष्णू आवटे, तुकाराम गडदे.