उंदरगाव (ता. करमाळा) येथे वास्तव्यास असलेले मनोहर भोसले या महाराजांना अनेक राजकीय बड्या नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. याबरोबर राज्यातून अनेकजण दर्शनासाठी येतात. मात्र सध्या हे प्रकरण वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहे. आदमपूर ग्रामपंचायतीने त्यांच्या विरोधात निषेधाचा ठराव केला आहे. आदमपूर ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी भोसले यांच्याविषयी तक्रारी आलेल्या आहेत. याशिवाय बाळू मामाचे नाव सांगून आपले आर्थिक हितसंबंध जोपासत आहोत. श्री बाळूमामाची शक्ती, श्रद्धा, भजन, कीर्तन इतकेच हे क्रमप्राप्त आहे. मात्र अशाप्रकारे भक्तांची लूट करणे हे श्री बाळूमामांच्या तत्त्वात बसत नाही. त्यांनी आपले संपूर्ण अवतार काळात कोणाकडूनही एक दाम घेतला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने भोसले यांचा धिक्कार व निषेध केला आहे. याबाबतचा त्यांनी ठरावही मंजूर केला आहे.
हे कुठले बाळूमामांचे अवतार, ही तर भक्तांची चक्क दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:26 AM