सोलापूर : राजधानी दिल्ली येथील हजारी न्यायालयात पोलिसांनीवकिलांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, जिल्हा सत्र न्यायालयात द सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने लाल फित लावुन काम करण्यात आले.
२ नोव्हेंबर रोजी हजारी न्यायालयाच्या आवारात गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून पोलिसांनीवकिलास मारहाण केली होती. मारहाणीमुळे वकिल आणि पोलीस यांच्यात वाद निर्माण झाला. वकिलावर हल्ला झाल्याने मुंबई येथे बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाची बैठक घेण्यात आली. बैठकीत बुधवारी लाल फीत लावुन आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता.
द सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने लाल फित लावुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत सर्व वकिलांनी बुधवारी दिवसभर लाल फिती लावुन कामकाज केले. सरकारी वकिल वगळता निषेधात अध्यक्ष अॅड. बसवराज सलगर, अॅड. गणेश पवार, सचिव अभिषेक गुंड, खजिनदार हेमंत साका, सहसचिव वैशाली बनसोडे, अॅड. रियाज शेख, अॅड. रविराज सरवदे, अॅड. संतोषकुमार बाराचारे, अॅड. चंद्रसेन गायकवाड, अॅड. सुनिल हळ्ळे, अॅड. मनोहर फुलमाळी आदी बहुतांश वकिलांनी सहभाग घेतला होता. -------------हजारी न्यायालयात झालेला हल्ला हा निंदनीय आहे, या प्रकारामुळे वकिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. याचा निषेध म्हणुन बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या आदेशावरून लाल फिती लावुन निषेध केला आहे. - बसवराज सलगर, अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर