सुनील बिस्किटे हे बारा एकर शेतात औषधी, सुगंधी वनस्पती जेरेनियम, जी विलास पेरू, व्हीएनआर पेरू, १५ नंबर व्हायरस फ्री पपई, शेवगा, लिंबू, सीताफळ अशी फळपिके व ऊस अशी शेतीत वेगवेगळ्या पिकांची लागवड करणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.
शेतात कोणत्याही पिकापासून भरघोस उत्पन्न मिळते याची खात्री पटली. ऐन उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा तुटवडा असतो. शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळत नसल्याने त्यांनी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जमिनीची मशागत करून शेतात मका पिकाची लागवड केली.
मकाची लागवड केल्यापासून १८:४६ दोन पिशव्या, प्रत्येक पाण्याबरोबर १०:२६ व लष्करी आळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधांची मकाच्या पोग्यात फवारणी केली. कणीस भरतेवेळी पोटॅशची प्रतिएकर एक पिशवी, असे पाण्याचे नियोजन केले. सध्या मका पीक जोमात आले असून एका ताटाची उंची १० ते १२ फूट इतकी आहे. एका ताटाचे दोन तुकडे व दाट मका, मोठी कणसे असल्याने एका गुंठ्यात डबल चारा निघत असल्याने १६०० ते १७०० रुपये गुंठ्याप्रमाणे शेतकरी मका चारा खरेदी करून हिरव्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावत आहेत.
कोट :::::::::::::::
शेतकऱ्यांनी कमी दिवसात व कमी खर्चात जास्त उत्पन्न निघणारी पिके घ्यावीत. वेळोवेळी पाण्याचे व खताचे नियोजन केल्यास भरघोस उत्पन्न मिळते.
- सुनील बिस्किटे
शेतकरी, सुस्ते