सोलापूर : पंढरपुरातील देशमुख यांच्या हॉस्पिटलवर व मंगळवेढा येथील रत्नपारखी सराफ बंधूंच्या दोन ज्वेलर्स दुकानात आयकर विभागाच्या वतीने सर्व्हे (तपासणी) करण्यात आली. सलग तीन दिवस हा सर्व्हे होत असल्याची माहिती आयकर विभागाचे अधिकारी बी.वाय. चव्हाण यांनी दिली.
आयकर विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध व्यापारी व उद्योजकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बुधवारी मंगळवेढ्यातील रत्नपारखी सराफ बंधूंच्या दोन दुकानांची एकाचवेळी तपासणी करण्यात आली. बुधवारी सुरू झालेली तपासणी गुरुवारी दुपारपर्यंत सुरू होती. गुरुवारी ही तपासणी सुरू असताना दुसरीकडे पंढरपुरात अचानक देशमुख यांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. देशमुख यांचे हॉस्पिटल मोठे असून तेथे सिटी स्कॅन, एमआरआय, कार्डिओलॉजी आदी मशिनरी आहेत.
गेल्या दोन महिन्यापूर्वी शहरातील कापड व्यापारी व हॉटेल्सचा सर्व्हे करण्यात आला होता.. आयकर विभागाने शहर व जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक आदींची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. उत्पन्नामध्ये तफावत निघाल्यास बेहिशोबी मालमत्तेचा कर भरण्याच्या सूचना आयकर विभागाच्या वतीने दिल्या जात आहेत.
तपासणीचा धसकाव्यापारी, उद्योजकांमध्ये सध्या मार्च एन्डचा विचार सुरू आहे. वर्षाचा हिशोब, शासनाला भरावा लागणारा कर याचा ताळमेळ घालत असताना, आयकर विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणामुळे व्यापाºयांनी धसका घेतला आहे. हॉस्पिटल आणि सराफ व्यापाºयांवर सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणासाठी आयकर विभागाच्या वतीने पथके तयार करण्यात आली असून, अचानक दुकानांची तपासणी केली जात आहे.