महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या गट नं. २ या परिसरात जवळपास तीन ते चार हजार इतकी लोकसंख्या आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे पावसाळ्यात येथे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या या साथीच्या रुग्णांमध्येही वाढ होत असते. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या परिसरात जवळपास वीस ते पंचवीस कोविड रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत पंधरा ते वीस कोविड रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.
कोरोनाबाधितांची माहिती देणे आवश्यक
कोविडचे रुग्ण येथील खासगी डॉक्टर, लॅबमध्ये उपचार व तपासणी करून घेतात, ते शासनाला कळविले जात नाही. त्यामुळे बरेचसे रुग्ण उपचारावाचून मृत्युमुखी पडत आहेत. येथील खासगी डॉक्टर व लॅबने कोविड रुग्णांची माहिती शासनाला देणे आवश्यक आहे. याबाबत डॉक्टर व लॅब चालकांची बैठक घेऊन माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी दिली.
कोट :::::::::::::
महाळुंग गट नं. २ मध्ये पाहणी दौरा करून तेथील परिस्थितीची माहिती घेतली जाईल. कोविड रुग्ण शोधून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे करून घेतली जातील.
- विश्वनाथ वडजे
मुख्याधिकारी, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत