आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : राज्य सेवा पदांच्या संख्येत वाढ करावी, या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सोलापुरातील विद्यार्थ्यांनीही पदसंख्येत वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या मोर्चाचे नेतृत्व विद्यार्थ्यांनीच केले होते. चार हुतात्मा चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विसर्जित झाला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात म्हटले आहे की, राज्य सेवेच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत ४५० पेक्षा जास्त जागा वाढविण्यात याव्यात, संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे पीएसआय, एसटीआय, एएसओची स्वतंत्र परीक्षा घेऊन १५०० पेक्षा जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी, एमपीएससीने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी, एमपीएससीने उत्तर पत्रिकेसाठी बारकोड प्रणालीचा वापर करावा, राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी, एमपीएससीने परीक्षा केंद्रावर मोबाइल जॅमर बसवावेत, एमपीएससीने तामिळनाडू लोकसेवा आयोगाचा पॅटर्न राबवावा, तलाठी पदाची परीक्षा एमपीएसएसीद्वारे घेऊन जास्तीत जास्त पदांची जाहिरात काढावी. डमी रॅकेट उघड करणाºया नांदेड येथील योगेश जाधवच्या संरक्षणात वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्या सादर करण्यात आल्या. यावेळी विकास वायकुळे, मुकेश माने, निखिल बंडगर, रेश्मा वायकुळे, तेजश्री दोडमिसे, अक्षय दोडमिसे, प्रसाद माने, उमेश गोडणे, सत्यवान सातपुते, दिनेश मस्के, प्रेम माने, अक्षय बंडगर, बापू गावंडे, स्वरा गोवर्धन, सुषमा वायकुळे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.-----------------------------मोर्चातील लक्षवेधी फलक- अभ्यास करून करून आयुष्य राहिले कमी डमीच देतो फक्त नोकरीची हमी, परीक्षेतील घोटाळ्यांचा चालू आहे सतत खेळ मर मर अभ्यास करणाºयांचा फुकट चालला वेळ, सेवाहमी कायद्याची नुसती घोषणा काय कामाची गरज आहे रिक्त जागा त्वरित भरण्याची, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारातच घ्या प्रत्येकाचे थंबिंग हेच असेल परीक्षेच्या गैरप्रकारावर योग्य बॉम्बिंग अशा घोषणा फलकावर लिहिल्या होत्या.
एमपीएससीच्या भरती संख्येत वाढ करा, सोलापूरात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 2:22 PM
राज्य सेवा पदांच्या संख्येत वाढ करावी, या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सोलापुरातील विद्यार्थ्यांनीही पदसंख्येत वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देया मोर्चाचे नेतृत्व विद्यार्थ्यांनीच केले होते. चार हुतात्मा चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विसर्जित झालानिवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलेप्रत्येकाचे थंबिंग हेच असेल परीक्षेच्या गैरप्रकारावर योग्य बॉम्बिंग अशा घोषणा फलकावर लिहिल्या होत्या.