आदर्श पब्लिक स्कूलच्या सभागृहात माढा तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची गुणवत्तेविषयी आढावा बैठक पार पडली. यावेळी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे बोलत होते. त्यांंनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले.
या बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, आदर्श पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अमोल सुरवसे उपस्थित होते.
यावेळी उपसंचालक उकिरडे म्हणाले, माढा तालुक्यातून नामांकित शाळा नावारूपाला आणून क्रियाशील मुख्याध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटवावा व विद्यार्थिकेंद्रित शिक्षण देऊन शालेय गुणवत्ता सुधारावी. त्याचबरोबरच एनटीएस स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत आपले विद्यार्थी चमकावा, असेही आवाहन सर्व मुख्याध्यापकांना केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी मुख्याध्यापकांना तंत्रस्नेही बना आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा व पालकांच्या अडचणी समजून घ्या, असे मार्गदर्शन केले.
आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक अमोल सुरवसे, संस्थेचे संचालक शिवाजी हावळे, प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे यासह माढा तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
................
१४ कुर्डूवाडी
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांंना मार्गदर्शन करताना पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे.