सोलापूर : सोलापुरात आता उन्हाळा जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांच्या कमाल तापमानाच्या तुलनेत शनिवारी तापमान एक अंशाने उतरले असले तरी उन्हाचे चटके जाणवत होते. शिवाय उकाडाही आता वाढू लागलेला आहे.
फेब्रुवारी महिन्यातील काही दिवसांचा अपवाद वगळता दररोज तापमानात वाढ होत आहे. १८ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान हे ३२.४ इतके होते; तर १९ फेब्रुवारी रोजी तापमान ३० अंश सेल्सिअस होते. २० फेब्रुवारीपासून तापमानात दररोज एक अंश सेल्सिअसने वाढ होत आहे. २५ फेब्रुवारी रोजी दोन अंश सेल्सिअसनी तापमानात वाढ झाली.
उन्हाची काहिली वाढत असल्यामुळे अडगळीत ठेवलेले कूलर, पंखे पुन्हा बाहेर काढण्यात येत आहेत. बंद असलेले कूलर आणि फॅन हे दुरुस्तीसाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात दाखल झाल्याचे दिसत आहे. तसेच नवे कूलर, पंखे व एसी घेण्यासाठी नागरिक इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जात आहेत.
मागील पाच दिवसांतील कमाल तापमान
- २३ फेब्रुवारी - ३४.७
- २४ फेब्रुवारी - ३५.०
- २५ फेब्रुवारी - ३७.४
- २६ फेब्रुवारी - ३७.६
- २७ फेब्रुवारी - ३६.६
- २८ फेब्रुवारी - ३८.०८