पंढरपूर तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोनाबाधितांचा शोध घेतला जात आहे. कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या २१ गावांत १४ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे, तसेच ज्या गावांत १० किंवा १० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली. त्याठिकाणीदेखील कोरोनाची चाचणी वाढवण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात १९९ जणांच्या कोरोना टेस्ट झाल्या, त्यामध्ये ५ जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.
दुकानात ग्राहक दिसले तरी तपासणी
ग्रामीण भागातील गावांत, अधिक रुग्ण असलेल्या गावांतील दुकानांत खरेदीसाठी ग्रामस्थांनी गर्दी केल्यास त्या ग्रामस्थांची किंवा ग्राहकांचीदेखील कोरोनाची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुटका करून घ्यायची असेल, तर नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत, असे सुशीलकुमार बेल्हेकर यांनी स्पष्ट केले.
----