सोलापूर : परिसरातील महिलांना पाहून अश्लील हातवारे करत त्यांना लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बजरंग शिवाजी गायकवाड व रियाज जावेद शेख ( दोघे रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.
पीडितेच्या घरा परिसरत आरोपी हे गेल्या अनेक दिवसापासून फिरत होते. पाच ते सहा महिन्यापासून आरोपी बजरंग व रियाज असे दोघे पीडितेला एकटक नजरेने पाहत होते. शिवाय पीडितेच्या घरासमोरून जाऊन खिडकीतून डोकावून अश्लील इशारे करत होते. दरम्यान, पीडितेला परिसरातील एका महिलेने वरील दोन्ही आरोपी हे त्या महिलेलाही अश्लील नजरेने पाहत होते.
याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी वाद घातला. शिवाय बजरंग याने दारू पिऊन त्यांच्या घराजवळ लघुशंका केली. अशाच प्रकारे आणखी महिलांनाही आरोपीने त्रास दिला. अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास मपोसई व्हट्टे करीत आहे.