शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

परीक्षांच्या तोंडावर बेमुदत संप, विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन

By appasaheb.patil | Published: February 20, 2023 3:24 PM

शेकडो  कर्मचाऱ्यांचा सहभाग; वर्गखोल्या उघडल्या नसल्याने विद्यार्थ्यांचा पायरीवरच वर्ग

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : वालचंद शिक्षण समूहातील बेमुदत संपात सहभागी नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरू केले. दयानंद महाविद्यालयातील वर्ग खोल्या उघडले नसल्यामुळे विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्याचा प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा वर्ग पायरीवर घेतला.

विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप सोमवारपासून (दि.२०) सुरु झाला. विद्यापीठासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील ३७ महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी आहेत. बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी वालचंद शिक्षण समूहातील महाविद्यालयाच्या गेटसमोर शहरातील अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात निदर्शने व घोषणा देऊन आंदोलन सुरू केले. आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे सेनेचे विष्णू कारमपुरी, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, कस्तुरबाई कॉलेज एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. आश्विन बोंदार्डे यांनी भेट देऊन या संपास शुभेच्छा देऊन पाठिंबा व्यक्त केला. यावेळीदोन्ही प्राचार्याचेंही बुके व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी शहरातील संगमेश्वर, दयानंद, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला, युनियन महिला, वसुंधरा, सोलापूर सोशल, ए. आर. बुर्ला व छत्रपती शिवाजी रात्र या शहरातील अनुदानित महाविद्यालयातील ३०० कर्मचारी वालचंद शिक्षण समूहातील महाविद्यालयाच्या गेट समोर उपस्थित होते. राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोटे, विभागीय सचिव अजितकुमार संगवे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, खजिनदार राहुल कराडे, सहसचिव इमाम लालका, दिपाली करजगीकर, आरती देशक, संजीवनी सादुल, नियाझ शेख, कय्युम पठाण, अल्ताफ होटगी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व घोषणा देऊन आंदोलन केले. 

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

मंगळवारी ( दि. २१) शहरातील सर्व महाविद्यालयातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळात निदर्शने आंदोलन करतील. ग्रामीण भागातील कर्मचारी तहसील कार्यालयासमोर तर विद्यापीठ कर्मचारी विद्यापीठाच्या गेटसमोर निदर्शने आंदोलन करतील, असे सोलापूर विद्यापीठ व महाविद्यालय संयुक्त सेवक कृती समितीने कळविले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरTeacherशिक्षकSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर