सोलापूर, दि. 15 - सोलापुरातील मोदी खाना चौकात आगळ्यावेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. सोलापूर ही कलावंतांची नगरी. याचं उदाहरण स्वातंत्र्य दिनानिमित्त पाहायला मिळाले. मोदी खाना चौकात नवोदित नगर येथे गवंडी काम करणारा अंबादास म्हेत्रे यांनी फळभाज्यांचा वापर करत देशाचा नकाशा साकरला.
देशाचा नकाशा साकारताना अंबादास म्हेत्रे यांनी गाजर, पांढरा मुळा आणि गाजर यांचा वापर केला आहे. गेल्या वर्षी याच मंडळाने विविध रंगी फुलांनी देशाचा नकाशा साकारला होता. यानंतर तिरंगा फडकवून तिरंग्याला सलामीसुद्धा देण्यात आली. नकाशा साकारण्यासाठी प्रत्येकी 5 किलो गाजर, मुळा आणि मिरचीची खरेदी करण्यात आली होती. गवंडी काम करणाऱ्या हातातून सिमेंटच्या माध्यमातून भिंतीवर, सिलिंगवर, घराच्या दर्शनी भागावर चित्रे काढली जातात मात्र याच गवंड्यानी देशाचा नकाशा साकारला.
आणखी बातम्या वाचा(काश्मीर समस्येवर मोदी म्हणाले, 'गाली से ना गोली से, परिवर्तन होगा कश्मिरी को गले लगाने से')(लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'न्यू इंडिया'चा नारा)(Independence Day 2017 : देशभरात उत्साहात साजरा होतोय स्वातंत्र्यदिन)