सोलापूर : देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरात अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र मध्य रेल्वेच्यासोलापूर रेल्वे स्थानकावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई सोलापूरसह राज्यभरातून आलेल्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे
देशात सर्वत्र ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त सोलापूरसह संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
सोलापूर रेल्वे स्थानकाला प्रजासत्ताक दिनानिमित्त तीन रंगाची रोषणाई करण्यात आली होती.
प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांनी हातात तिरंगा घेऊन स्टेशनच्या बाहेर फोटो काढले. लहान मुलांचा फोटो काढताना तिथं आलेल्या तरुणांना देखील त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
२६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. तेव्हापासून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.