अर्ज खरेदी करणाऱ्यांमध्ये माणिक शिवाजी भुई (रा. सरकोली, ता. पंढरपूर), सिद्धाराम सोमन्ना काकनकी (रा. सिद्धापूर, ता. मंगळवेढा), जगन्नाथ दगडू डोके (रा. माचणूर, ता. मंगळवेढा), बिराप्पा मधुकर मोटे (रा. तनाळी, ता. पंढरपूर), नागेश प्रकाश पवार (रा. स्टेशन रोड, पंढरपूर), सुदर्शन रामचंद्र खंदारे (२ अर्ज, रा. ढोर गल्ली, ता. पंढरपूर), सतीश विठ्ठल जगताप (रा. कालठण, ता. इंदापूर, जि. पुणे), पोपट हरी धुमाळ (रा. बोहाळी, ता. पंढरपूर), मनोज गोविंदराज पुजारी (रा. ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा), किशोर सीताराम जाधव (रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर), इलियास युसूफ शेख (रा. वाल्मीकीनगर-इसबावी, पंढरपूर) यांचा सहभाग आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सचिन अरुण शिंदे (रा. आंबे, ता. पंढरपूर) व अपक्ष म्हणून संजय नागनाथ माने (रा. कोर्टी, ता. पंढरपूर) तर मंगळवारी संतोष महादेव माने (अपक्ष) अशा तिघांनी अर्ज दाखल केले असल्याचे तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले.
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अपक्षाचा अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:22 AM