मंगळवेढा : मंगळवेढा येथे पेट्रोल व डिझेलच्या भाववाढी विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी,काँग्रेस, मनसेच्यावतीने आज सोमवारी सकाळी १०.३० वाजता दामाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून बंदला स्थगिती देण्यात आली.
पेट्रोल आणि डिझेलचे भाव सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढवत आहेत. वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. पण, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. महागाईवर नियंत्रण आणू असे आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले होते. मात्र, सत्तेवर आल्यावर ते आश्वासन विसरले असून आ.राम कदमाच्या रूपाने परत एकदा भाजपाची विचारधारा समोर आली आहे असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केला.
यावेळी विठ्ठल शुगरचे संचालक भगीरथ भालके, कॉग्रेसचे प्रा.शिवाजीराव काळूगे, राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित जगताप, प्रवीण खवतोडे, नगरसेविका अनिता नागणे, राजश्री टाकणे, विजय बुरकुल, कॉंग्रेसचे मारुती वाकडे, संतोष सोनगे, पोपट पडवळे, संजय बळवंतराव, पं.स.सदस्य नितीन पाटील,भारत बेदरे,महावीर ठेंगील, विजय खवतोडे, अशोक माने, मनसेचे चंद्रकांत पवार, शिवसेना कक्ष प्रमुख नारायण गोवे आदी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार अण्णासाहेब समींदर व पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना निवेदन देण्यात आले