सोलापूर : भारताला आॅलिम्पिक स्पर्धेत कमी पदके मिळतात, याचा संदर्भ घेऊन राज्यपाल म्हणाले की, खरं तर आपण जागतिक पातळीवर यश मिळविण्यासाठी सतत परिश्रम करायला हवे; पण आपले लोक केवळ भाषणे ठोकण्यात आघाडीवर असतात. ही आघाडी देशाला विविध क्षेत्रांत यशस्वी करण्यासाठी ठेवायला हवी, असे मत राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे मांडले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय २३ व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोश्यारी यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते.
क्रीडा क्षेत्रच मुळात ऊर्जावान आहे. या क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी मोठी ऊर्जा लागते; पण आपण खेळासाठी ऊर्जा खर्च करत नाही. त्यामुळेच आॅलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये देशाला पदके मिळत नाहीत. ही स्थिती बदलण्यासाठी युवकांनी परिश्रम घेऊन क्रीडा क्षेत्रात भारताला आघाडीवर न्यावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यपाल म्हणाले, शिक्षण असो वा खेळ या सर्व क्षेत्रात मुली पुढे जात आहेत़ मुलांनीही पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे़ पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर १८० देशांतील नागरिक हे योगा करत आहेत़ पण आपण मात्र पिछाडीवर आहोत अशी खंत व्यक्त करून आपणही योग केला पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.