सोलापूर : आर्थिक धोरणासाठी परिपक्व होण्यासाठी साधारणत: ३० वर्षे लागतात़ चीनने आपली आर्थिक नीती ही १९८१ मध्ये सुरू केली. यामुळे आता जगातील मार्केटमध्ये सध्या चीनी वस्तू दिसत आहेत. भारताने आर्थिक धोरणासाठी १९९१ मध्ये नीती सुरू केली. आता भारत परिपक्वतेच्या उंबरठ्यावर थांबला आहे. यामुळे २०२१ नंतर भारताचे दिवस येणार आहेत. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असेल. भारतीय अर्थव्यवस्था ही जगात तिसºया स्थानी पोहोचेल़ पहिल्या क्रमांकावर चीन त्यानंतर अमेरिका आणि तिसºया स्थानी भारत असेल असे मत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ़ शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना डॉ. देवळाणकर म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरणासाठीची आतापर्यंत ७५ देशांचे ९० दौरे केले आहेत. आतापर्यंत एवढे दौरे कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी केले नाही असे सांगितले जाते़ यामुळे त्यांच्या दौºयावर किती खर्च झाला याची माहिती माहिती अधिकार खाली मागितली जात आहे़ ती रक्कम जवळपास २५० कोटीपर्यंत आहे. पण या रकमेची तुलना अमेरिका, चीन आणि जपानचे राष्टÑाध्यक्षांची तुलना केल्यास त्यांच्या १० टक्के ही हे दौरे नाहीत.
चांगल्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक चांगले बदल होत आहेत. १९९० ते १९९३ दरम्यान भारताला इतर देशांना पैसे मागावे लागत होते़ पण आज परिस्थिती बदलली आहे़ आज आपण आपल्या शेजारी देशांनाही मदत करत आहोत़ याच बरोबर जागतिक बँकेलाही आपण पैसे देत आहोत़ दहा वर्षात विकास दर वाढत आहे़ आज देशात ४५० अब्ज डॉलर आपल्या फॉरेन्सिक इन्व्हेसमेंट केली आहे.
७० टक्के तेल आखातातून- आज अमेरिका आणि आखाती देशात जी युद्धजन्य परिस्थिती आहे़ याचा परिणाम आपल्यावर होत आहे. कारण आपल्या देशाला जेवढे पेट्रोल आणि डिझेल लागते यातील ८५ टक्के तेल आपल्याला आयात करावे लागते़ या ८५ टक्क्यांपैकी जवळपास ७० टक्के तेल हे आखाती देशामधून आयात केले जाते. तेथील तणावाच्या परिस्थितीमुळे आज बॅरेलचे दर वाढत आहेत़ तेथे एक पैशाची जरी वाढ झाली तर कोट्यवधीचा फटका आपल्याला बसतो़ असे मत यावेळी डॉ़ देवळाणकर यांनी व्यक्त केले.