सोलापूर : इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेसने पुकारलेल्या बंदला विविध पक्षांसह संघटनांनी पाठींबा दिला आहे़ याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी बाराच्या सुमारास मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने सात रस्ता येथील कारागीर पेट्रोल पंपासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात सहभागी झालेल्या माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह ६५ कार्यकर्त्याना शहर पोलीसांनी अटक केली.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर माकर्सवादी कम्युनिष्ठ पक्षाच्यावतीने सकाळी अकराच्या सुमारास सात रस्ता परिसरात धरणे आंदोलनाला सुरूवात झाली़ ११.५0 वाजता सदर बझार पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रेल्वे स्टेशन येथे बंदच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळण्यात आले. नवी पेठ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. आवाहन करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार आदी अन्य पक्षांच्या नेत्यांना पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी ताब्यात घेतले. शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद असुन शहराच्या मध्यवर्ती भागातील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पंढरपूरात ठिय्या आंदोलनभारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील विविध पक्ष व संघटनांनी सावरकर चौकात ठिय्या आंदोलन केले़ यावेळी या मार्गावरील वाहतुक खोळंबली होती़ विठ्ठल-रुक्मिणी मंदीर परिसरात बंदमुळे भाविकांची तुरळक गर्दी होती़ मात्र या परिसरातील दुकाने सुरू होती़