सोलापूर : इंदुमती गणपत कालेकर (५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी गणपत धोंडिबा कालेकर आणि पत्रकार विक्रांत कालेकर यांच्या त्या मातोश्री होत.
अनिता लिमये
सोलापूर : आध्यात्मिक लेखिका अनिता अरविंद लिमये (७५, रा. चौपाड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्च्यात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. औषध विक्रेते आशुतोष लिमये यांच्या त्या मातोश्री होत.
आण्णासाहेब गिराम
सोलापूर : उळेवाडीचे प्रगतीशील शेतकरी आण्णासाहेब तम्मप्पा गिराम (७२, रा. घोंगडेवस्ती) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
राजन धावडे
सोलापूर : ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू राजन धावडे (८१, जुने विठ्ठल मंदिर, चौपाड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शशिकला शिंदे
सोलापूर : शशिकला तम्मा शिंदे (७५, रा. रामलिंग सोसायटी, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
लताबाई चव्हाण
सोलापूर : लताबाई विठ्ठलसा चव्हाण (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठलसा चव्हाण यांच्या त्या पत्नी होत.
सुमित्रा शिलवंत
सोलापूर : सुमित्रा सिद्धप्पा शिलवंत (८६, रा. हनमगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
विमल बनसोडे
सोलापूर : विमल विठ्ठल बनसोडे यांचे निधन झाले. भाजपचे शहर चिटणीस देवीदास बनसोडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पाच मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
लक्ष्मीबाई गुरव
अक्कलकोट : कल्लेश्वर मंदिराच्या पुजारी लक्ष्मीबाई बलभीम गुरव (७०, रा. गोगाव, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
लक्ष्मीबाई इंदूरकर
सोलापूर : लक्ष्मीबाई बालाजी इंदूरकर (५१, रा. विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा शल्य नेत्र अधिकारी डॉ. गणेश इंदूरकर यांच्या त्या मातोश्री होत.
शारदाबाई हिबारे
सोलापूर : शारदाबाई दत्तात्रय हिबारे (८०, रा. गुलबर्गा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंता अमोल खमीतकर यांच्या त्या आजी होत.