सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण येत्या आठवड्यात शंभर टक्के भरण्याची अपेक्षा होती; मात्र पुणे जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मागील १२ तासात उजनीच्या वरील सर्व १९ धरणावर फक्त ४ मी.मी पावसाची नोंद झालेली आहे. अनेक धरणामधून सोडला जात असलेला विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. परिणामी, पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने आणखी काही दिवस उजनी धरण भरण्याची वाट पहावी लागणार आहे. पुणे बंडगार्डन येथील विसर्ग ४ हजार ८९८ क्यूसेक इतका चालू आहे. तर बंद करण्यात आलेला वीरमधील विसर्ग मध्यरात्री पुन्हा सुरू केला आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून काल पहाटे दोन वाजता ४६३७ विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
................
उजनी धरणातील पाणीपातळी
एकूण पाणीपातळी - ४९६.०० मीटर
एकूण पाणीसाठा - ३०५०.९४ (१०७.७३टी.एम.सी)
उपयुक्त साठा - १२४८.१३ दलघमी ( ४४.०७टी.एम.सी.)
टक्केवारी - ८२.२७ टक्के
.......
उजनीत येणार विसर्ग
दौंड : ४७२८ क्युसेक
बंडगार्डन :४८९८ क्युसेक