शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

शिक्षकांना जुनी पेन्शनसाठी मिळावी यासाठी मिस कॉल मोहिम, राज्यात अभूतपुर्व प्रतिसाद, प्रतिदिन १० हजार कॉल येत असल्याची नवनाथ धांडोरे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 9:04 AM

या अभियानाला लाखाहुन जास्त कॉल' आले आहेत. रोज किमान दहा हजार 'मिस्ड कॉल' येत असून अभियानास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्राबरोबरच  उत्तरप्रदेश ;पच्छिम बंगाल ;छत्तीसगड ;जन्मु काश्मीर ;मध्यप्रदेश या राज्यातुन मोठ्या प्रमाणात मिसकॉल येत आहे.

ठळक मुद्दे अवघ्या दहा दिवसात या अभियानाला लाखाहुन जास्त कॉल' महाराष्ट्राबरोबरच  उत्तरप्रदेश ;पच्छिम बंगाल ;छत्तीसगड ;जन्मु काश्मीर ;मध्यप्रदेश या राज्यातुन मोठ्या प्रमाणात मिसकॉलसप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये चालविलेल्या स्वाक्षरी मोहीमेस दिड लाखांहुन अधिक स्वाक्षºया

आॅनलाइन लोकमत सोलापूरवडवळ :  'जुनी पेन्शनसाठी आपली साथ हवी, फक्त एक 'मिस्ड कॉल' देऊन लढ्यास पाठिंबा दर्शवा', असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे राज्यातील तसेच देशातील नागरीकांना करण्यात आले आहे. अवघ्या दहा दिवसात या अभियानाला लाखाहुन जास्त कॉल' आले आहेत. रोज किमान दहा हजार 'मिस्ड कॉल' येत असून अभियानास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्राबरोबरच  उत्तरप्रदेश ;पच्छिम बंगाल ;छत्तीसगड ;जन्मु काश्मीर ;मध्यप्रदेश या राज्यातुन मोठ्या प्रमाणात मिसकॉल येत आहे. अशी माहिती संघटनेचे विश्वस्त व सोलापूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ धांडोरे यांनी  दिली.अनेक विभागातील राज्य व केंद्र शासनाचे पदाधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे  नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व राज्य सचिव गोविंद उगले यांच्या हस्ते या 'मिस्ड कॉल' अभियानाची सुरुवात करण्यात आली. मिस कॉल मोहीमेचे मुख्य प्रवर्तक सचिन खारतोडे यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य कर्मचाºयाच्या निवृत्ती वेतनाबाबत राज्य सरकारने ३१ आॅक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार १९८२-८४ च्या कायद्यानुसारची निवृत्तीवेतन योजना बंद करून शेअर बाजारावर आधारीत नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. मात्र १२ वषार्नंतरही त्याला कायद्याचा आधार नाही, कपातीचा हिशोब नाही त्यामुळे सर्व कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संगठनने वारंवार निवेदने देऊन, नागपूर आक्रोश मोर्चा, जिल्हानिहाय मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे करून १९८२ ची कायद्यानुसारची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी केली आहे.------------------ मिस कॉल द्या़़़सहभाग नोंदवा़़सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना मिळावी, या मागणीला पाठींबा देण्यासाठी ८४४८४९३५४४ या क्रमांकावर समाजातील सर्व विचारशील नागरिकांनी, सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांनी 'मिस्ड कॉल' द्यावा, असे जाहीर आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ धांडोरे ; सरचिटणीस अरूण चौगुले सोशल मिडीया प्रमुख प्रकाश कोळी  यांनी राज्यातील तसेच देशातील नागरीकांना केले आहे.---------------सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये चालविलेल्या स्वाक्षरी मोहीमेस दिड लाखांहुन अधिक स्वाक्षºया झाल्या होत्या. १९८२ च्या जुनी पेन्शन योजना समर्थनार्थ जनजागृती आणि लोकसहभागासाठी महाराष्ट्रातून 'मिस्ड कॉल' अभियानास सुरुवात झाली असून ते देशभर राबवले जात आहे़- नवनाथ धांडोरेजिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरTeacherशिक्षक