सोलापूर : तब्बल २९ दिवस पोलिसांना गुंगारा देणारा मटकाकिंग भाजपचा नगरसेवक सुनील कामाठी याला अटक झाल्यानंतर त्याच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये असलेल्या नावांची चौकशी होणार आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोंचीकोरवी गल्लीतील राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर मुख्य सूत्रधार सुनील कामाठी याच्या घराची झडती घेण्यात आली होती. घरात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये इतर नोंदवह्यांबरोबर एक हिशोबाची वही आढळून आली आहे. हिशोब वहीमध्ये जेलरोड पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिमहिना कोणाला किती पैशाचे वाटप केले जात होते, याची नोंद असल्याचे समजते. बीट मार्शलपासून अधिकाºयांपर्यंत १६० लोकांच्या नावांची यादी असल्याचे समजते. प्रत्येक महिन्याला ५० ते ६० लाख रुपयांचे वाटप केल्याच्या नोंदी हिशोबाच्या वहीमध्ये असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. नोंदवहीमधील नावे सांकेतिक भाषेत लिहिण्यात आलेली आहेत. ही नावे कोणाची आहेत याची माहिती दस्तुरखुद्द सुनील कामाठी याच्याकडून घेतली जाणार आहे.
सुनील कामाठीवर आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता?नगरसेवक सुनील कामाठी याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २५ गुन्हे दाखल आहेत. शिवाय मटकाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचा नगरसेवक म्हणून समाजसेवेचा बुरखा पांघरून फिरणाºया नगरसेवक सुनील कामाठी याच्यावर पोलीस आयुक्तालयाकडून आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे, असे समजते. शहरातील मोठ्या राजकीय नेत्यांमार्फत ही कारवाई होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे कारवाई करणार यात कसलीही शंका नाही, असेही बोलले जात आहे.
सुनील कामाठीच्या पत्नीला दोन दिवसांची पोलीस कोठडीमटक्यातील व्यवहार पाहणाºया नगरसेवक सुनील कामाठी याच्या पत्नी सुनीता कामाठी व मटक्याच्या कामात सहकार्य करणाºया हुसेन तोनशाळा या दोघांनाही गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. बावरे यांच्यासमोर उभे केले असता दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. श्रीकांत पवार तर सरकारतर्फे अॅड. करवते हे काम पाहत आहेत.
गोरगरीब, हातावर पोट असणाºया कष्टकºयांच्या श्रमाचा पैसा मटक्यामध्ये लावला जातो. या पैशावर मटका एजंट, मटका बुकी व मटका चालक, मालक गडगंज होतात. मटका या जुगाराला सहकार्य करणाºयाची माहिती घेतली जात आहे. पोलीस कर्मचारी असो किंवा अन्य कोणी, कोणाचीही गय केली जाणार नाही. - अंकुश शिंदे पोलीस आयुक्त.