निवडणुकीनंतर आ. अरुण लाड कार्यकर्ते, पदवीधरांचे आभार मानण्यासाठी पंढरपूरला आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार यांनी पदवीधरांसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या गावातून अभ्यासिका निर्माण करण्यासाठी निधी द्यावा. पदवीधर तरुण-तरुणींना उद्योग-व्यवसायासाठी कमी व्याजदरात सबसिडीसह कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके, युवराज पाटील, तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार, युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, शहराध्यक्ष सुधीर भोसले, चंद्रकांत देशमुख, राजेश भादुले, लतिफ तांबोळी, नरसाप्पा देशमुख, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब यलमार, हेमंत पाटील, रमेश पाटील, अरुण आसबे, श्रेया भोसले, साधना राऊत, अनिता पवार, सागर पडगळ आदी उपस्थित होते. प्रस्तावित तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार यांनी केले. शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी आभार मानले.
फोटो ओळी ::::::::::::::::::
पदवीधरचे आ. अरुण लाड यांचा सत्कार करताना युवराज पाटील, बळीराम साठे, दीपक पवार, गणेश पाटील, सुधीर भोसले आदी.