पानगाव : बार्शी तालुक्यात पिंपळगाव (ढाळे) मध्यम प्रकल्पातील बुडित क्षेत्रातील महागाव व तांदुळवाडी या पुनर्वसित गावांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. या गावांतील अपूर्ण नागरी सुविधांबाबत चर्चा केली. त्यानंतर नागरिकांच्या समस्या जाणून घेत चव्हाण यांनी संबंधितांना सूचना केल्या.
यावेळी प्रकल्पाचे अभियंता झोळ, शाखा अभियंता जाधव, सर्कल शिंदे, तलाठी शिंदे व ग्रामसेवक खोबरे यांना लवकर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी बाळासाहेब पाटील, उपसरपंच हनुमंत मोरे, तं. मु. अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, पांडुरंग पाटील, उमेदचे उमेश घोलप, अमोल मोरे, विशाल चापले, विष्णू पाटील, मेघनाथ गायकवाड, नारायण चापले, सचिन मोहिते, विलास गायकवाड आदी उपस्थित होते.