सोलापूर : कुमठे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात उभारण्यात येणाºया पर्यायी चिमणीची जागा पाहण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी बुधवारी कारखानास्थळावर जाणार आहेत.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनात बैठक झाली. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
विमानतळावरून एका बाजूला विमान उड्डाण करण्यास सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील चिमणी अडथळा ठरत असल्याचा अहवाल भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिला आहे. यानंतर ही चिमणी हटविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने कारखाना प्रशासनाला दिले होते. यावरून बराच गदारोळ झाला. यानंतर कारखान्याने पर्यायी चिमणी उभारण्याची तयारी दर्शविली.
प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी विमान उड्डाणातील अडचणी मांडल्या, तर काडादी यांनी पर्यायी चिमणी उभारल्यामुळे कारखान्याचे नेमके काय नुकसान होईल, यासंदर्भातील मुद्दे मांडले. जिल्हाधिकाºयांनी दोघांचीही बाजू ऐकून घेतली. प्राधिकरणाचे अधिकारी बुधवारी कारखानास्थळावर जाऊन पर्यायी चिमणीच्या जागेसंदर्भात पाहणी करणार आहेत. यानंतर हे अधिकारी आपला अहवाल देणार आहेत.
कारखान्याने मागितले मार्गदर्शन- विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी कारखानास्थळावर यावे. त्यांनीच कारखानास्थळावरील पर्यायी जागा सुचवावी, अशी मागणी कारखान्याच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकरणाचे अधिकारी सोलापुरात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी चर्चा घडवून आणली.